महाराष्ट्रात शेतकऱ्यांना पेरण्यांपूर्वी #खतं, #रसायने, बी-बियाणे इत्यादींची तयारी करावी लागते. त्यासाठी #कृषी सेवा केंद्रात जाऊन या सगळ्यांची खरेदी करावी लागते. तसे आंध्र प्रदेशात शेतकऱ्यांना ही धावाधाव करण्याची गरज नसते. कारण त्यांच्या #रयतु भरोसा केंद्रामार्फत या गोष्टी शेतकऱ्यांना पुरवण्यात येतात.
शेतकऱ्यांच्या खते, बी-बियाणे, #कीडनाशके, शेतीमालासाठी बाजारपेठ अशा अनेक गरजांची एकाच ठिकाणी पूर्तता करणारी आंध्र प्रदेशातील #रयतु_भरोसा_केंद्र ही त्या राज्याच्या कृषी विभागाची आगळीवेगळी ओळख बनली आहेत. शेतकऱ्यांच्या जमिनींच्या नोंदीपासून ते त्यांच्या पिकांना रास्त दर मिळवून देण्यासाठी माहिती देणे, पिकांबाबत मार्गदर्शक करण्याचे कामही रयतु भरोसा केंद्राच्या माध्यमातून करण्यात येते. एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांना वित्तपुरवठ्याचे काम या केंद्रांकडून करण्यात येत आहे.
#RythuBharosaScheme #Rythu #JaganMohanReddy #SchemesforFarmers #AgricultureNews #esakal #SakalMediaGroup